Home >> देश -परदेश >> जंतर-मंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: उपोषणाला बसलेल्या अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक!

जंतर-मंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: उपोषणाला बसलेल्या अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक!

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात हलवले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी पहाटे साध्या वेशात ही कारवाई केली. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात नेल्यानंतर दीपके यांनी उपोषण सुरू केले होते.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22 mins ago
जंतर-मंतरवर हायव्होल्टेज ड्रामा: उपोषणाला बसलेल्या अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक!

नवी दिल्ली: दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाला आज धक्कादायक वळण मिळाले. 'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी गेली २१ दिवस उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी सकाळी पोलिसांनी बळजबरीने सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर आंदोलन सुरू ठेवण्यासाठी मंचावर बसलेले 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर एका अज्ञात महिलेने शाई फेकल्याने घटनास्थळी प्रचंड गदारोळ उडाला.


सोनम वांगचुक को सफदरजंग अस्पताल ले जाने के बाद भूख हड़ताल पर बैठे दीपके पर महिला ने स्याही फेंकी। - Dainik Bhaskar


पोलिसांनी वांगचुक यांना कसे हलवले?

दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांच्या आरोग्याची रोज तपासणी करण्याचे आणि गरज पडल्यास उपचार करण्याचे आदेश दिले होते. २१ दिवसांच्या उपोषणाने वांगचुक यांचे वजन साडे नऊ किलोने घटले होते.


मंच पर मौजूद प्रदर्शनकारियों ने पुलिस को रोकने की कोशिश की।


शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, जंतर-मंतरवर गर्दी सर्वात कमी असताना, दिल्ली पोलिसांचे ३० ते ३५ जवान साध्या वेशात तेथे पोहोचले. आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वतःला 'वैद्यकीय पथक' असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी वांगचुक यांच्या खाटेला चारही बाजूंनी पांढऱ्या चादरीने घेरले, जेणेकरून कोणाला काही दिसणार नाही आणि त्यांना थेट ॲम्ब्युलन्समध्ये उचलून रुग्णालयात नेले. या कारवाईदरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली.


पुलिस और सेंट्रल फोर्स के जवानों ने वांगचुक को मंच से सफेद चादर में उठाया।


अभिजीत दीपके यांच्यावर शाईफेक

वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यानंतर आंदोलन मागे न घेता कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दीपके स्वतः उपोषणाला बसले. ते मंचावरून खाली येऊन बसले असता, एका अज्ञात महिलेने त्यांच्यावर अचानक शाई फेकली. यामुळे जंतर-मंतरवर एकच गोंधळ उडाला. तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी तातडीने त्या महिलेला पकडले. या कृत्यामागचा तिचा हेतू आणि तिची ओळख अद्याप पटलेली नाही.


Woman throws ink-like liquid at Abhijeet Dipke


"वांगचुक यांना डांबून ठेवले आहे" : दीपके यांचा आरोप

रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, पण त्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमालीचे घटले आहे. दरम्यान, अभिजीत दीपके यांनी आरोप केला आहे की, माझी सोनम सरांशी चर्चा झाली असून त्यांना रुग्णालयात डांबून ठेवण्यात आले आहे, त्यांना परत जंतर-मंतरवर यायचे आहे. ते जोपर्यंत परत येत नाहीत, तोपर्यंत मी मंचावर जाणार नाही.


पुलिस वांगचुक को उठाकर एंबुलेंस तक ले गई।


२० जुलैचा संसद मार्च ठाम

२० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी सांगितले की, आम्हाला सोनम यांची मेडिकल रिपोर्ट दाखवली जात नाहीये. पण सोनम मार्चमध्ये सामील होऊ शकले नाहीत, तरी त्यांच्या वतीने मी या मोर्चाचे नेतृत्व करेन. २० जुलैचा संसद मार्च ठामपणे होणारच. 



दरम्यान, दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या संसद मार्चसाठी कॉकरोच जनता पार्टीने अद्याप कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही. जंतर-मंतर परिसरातील तणाव पाहता सफदरजंग रुग्णालयाबाहेर आणि आंदोलन स्थळाभोवती कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा
सर्व पहा