Home >> ताज्या बातम्या >> बँकॉकच्या पबमध्ये अग्नितांडव; २७ ठार तर ६० हून अधिक जखमी

बँकॉकच्या पबमध्ये अग्नितांडव; २७ ठार तर ६० हून अधिक जखमी

गोव्यातील 'बर्च बाय रेमियो लेन' क्लबप्रमाणेच स्टेजवरून भडकली आग

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
42 mins ago
बँकॉकच्या पबमध्ये अग्नितांडव; २७ ठार तर ६० हून अधिक जखमी

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका पबमध्ये सोमवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. बँकॉकच्या उत्तरी भागातील 'ना लादप्राओ' पबमध्ये लागलेल्या या आगीत तब्बल २७ लोकांचा होरपळून व गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींपैकी २२ जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.



वीज अचानक गेली अन् झाला मोठा स्फोट

थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली. पबमध्ये परफॉर्म करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर स्टेजजवळ असलेल्या सर्किट ब्रेकरमधून अचानक धूर निघू लागला. त्यानंतर काही सेकंदांतच पबमधील वीज पुरवठा खंडित झाला आणि एक मोठा स्फोट झाला व यंग लागली. या स्फोटानंतर संपूर्ण पबमध्ये वेगाने काळा आणि विषारी धूर पसरला. आग इतकी वेगाने पसरली की लोकांना बाहेर पडण्याचा मार्गच सापडला नाही. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये, लोक पबच्या मुख्य दरवाजातून आग आणि धुराच्या वेढ्यातून जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. अनेक मृतांकडे ओळखपत्रे नसल्यामुळे आणि अनेक जण बेशुद्ध असल्याने प्रशासनाला त्यांची ओळख पटवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.


27 dead, dozens injured after fire in Bangkok pub


गोवा, लखनऊ आणि बँकॉक दुर्घटनांमधील धक्कादायक साम्य

बँकॉक येथील या भीषण दुर्घटनेची पार्श्वभूमी आणि परिस्थिती हुबेहूब गेल्या काही काळातील गोवा आणि लखनऊ येथील अग्निकांडांसारखीच असल्याचे समोर आले आहे. या तिन्ही दुर्घटनांमध्ये कमालीचे साम्य दिसून येते:

१. आगीची सुरुवात (गोवा आणि बँकॉक साम्य) :

गोव्यामध्ये गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात हडफडे येथील 'बर्च बाय रेमियो लेन' (Birch Bye Remio Lane) नाईटक्लबमध्ये डान्स पेरफॉर्मन्स सुरू असताना भीषण आग लागली होती. गोव्यात ही आग स्टेजवरील इलेक्ट्रिकल फायरवर्क्समुळे (फटाके) भडकली होती आणि त्यात २५ जणांचा मृत्यू झाला होता. बँकॉकच्या पबमध्येही अगदी तशीच सुरुवात झाली; येथेही स्टेजजवळील सर्किट ब्रेकर शॉर्ट सर्किटमुळे भडकला आणि संपूर्ण पब खाक झाला.


FIR against owners of Goa's Birch by Romeo Lane after 25 killed in huge fire  at nightclub; sarpanch detained - India Today


२. सुरक्षिततेसाठी बाथरूमचा आसरा अन् गुदमरून मृत्यू (लखनऊ आणि बँकॉक साम्य):

काही काळापूर्वीच लखनऊच्या अलीगंज परिसरात एका अ‍ॅनिमेशन कोचिंग सेंटरच्या इमारतीला भीषण आग लागली होती. त्यावेळी आगीच्या ज्वाला आणि धुरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी १६ ते २१ वयोगटातील निष्पाप विद्यार्थी इमारतीच्या मागील बाजूच्या टॉयलेट आणि बाथरूममध्ये जाऊन लपले होते. दुर्दैवाने, तिथे धूरामुळे श्वास कोंडल्याने गुदमरून १५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. बँकॉकमध्येही अगदी अशीच घटना घडली. पबच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडता न आल्याने अनेक ग्राहकांनी मागच्या बाजूच्या रेस्टरूममध्ये आश्रय घेतला. अग्निशामक दलाने अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत रेस्टरूममध्ये लपलेल्या बहुतांश लोकांचा गुदमरून मृत्यू झाला होता आणि तिथे मृतदेहांचा खच पडला होता.



सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निष्काळजीपणा

थायलंडमधील नाईटक्लब आणि पबमध्ये सुरक्षा मानकांकडे (Safety Norms) दुर्लक्ष करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी वर्ष २०२२ मध्ये पूर्व भागातील एका म्युझिक पबमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. तर १ जानेवारी २००९ रोजी बँकॉकच्या प्रसिद्ध 'सांतिका नाईटक्लब'मध्ये नवीन वर्षाच्या स्वागतादरम्यान इनडोअर फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत ६६ भाविक-पर्यटकांना जीव गमवावा लागला होता.


Bangkok Fire News | 27 Killed, 22 Critical In Massive Fire At Bangkok Bar


गोव्यातील क्लब असो, लखनऊचे कोचिंग सेंटर असो की बँकॉकचा पब— आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त दरवाजे (Emergency Exits) नसणे, अंतर्गत सजावटीसाठी ज्वलनशील साहित्याचा वापर आणि तांत्रिक त्रुटींकडे केलेले दुर्लक्ष, याच गोष्टी निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठत असल्याचे या तिन्ही घटनांवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हेही वाचा
सर्व पहा