Home >> गोवा >> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोव्यात; पेलेंनी साधला संवाद

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोव्यात; पेलेंनी साधला संवाद

पर्यटन वाढीसाठी सहकार्याचे आवाहन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13 mins ago
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गोव्यात; पेलेंनी साधला संवाद

मडगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या गोव्यात खासगी दौर्‍यावर असून बाणावली किनारी मच्छीमार फ्रान्सिस उर्फ पेले फर्नांडिस (Pele Fernandes)  यांनी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांमधील पर्यटन संबंध अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.

 एकनाथ शिंदे सध्या कुटुंबीयांसह गोव्यात खाजगी दौर्‍यावर आहेत. बाणावली समुद्रकिनार्‍यावर फिरत असताना पेले फर्नांडिस यांनी त्यांची भेट घेतली. दक्षिण गोव्याच्या समुद्रकिनार्‍यावर सकाळी फेरफटका मारत असताना, उपमुख्यमंत्री शिंदे यांना पाहून मच्छीमार पेले यांनी त्यांची भेट घेतली. पेले हे मच्छीमारीसह वॉटर स्पोटर्ससाठीही प्रसिध्द असून विविध क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींची त्यांनी यापूर्वीही भेट घेतली आहे. पर्यटनवाढीसाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करत पेले यांनी दोन्ही राज्यांमधील मजबूत संबंधांवर भाष्य केले. मुंबई आणि महाराष्ट्रातील पर्यटक हे गोव्याच्या पर्यटनाचा मुख्य कणा आहेत. महाराष्ट्रातील पर्यटकांमुळेच गोव्याच्या पर्यटनात वाढ होत असल्याचे पेले यांनी शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना गोव्याला भेट देण्याचे आवाहन करावे, अशी विनंती त्यांनी शिंदेंना केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) यांनी पेले यांच्या या आवाहनाचा सकारात्मक स्वीकार केला. आणि त्यांच्याशी अत्यंत हलक्या-फुलक्या वातावरणात चर्चा केली.

या भेटीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे गोव्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची मागणी करणार्‍या पेले यांचे म्हणणे ऐकून घेत असून; सकारात्मक प्रतिसाद देताना दिसतात.