अस्नोडा येथे विजेच्या धक्क्याने घेतला कर्मचाऱ्याचा बळी

‘डयुटी’ बजावताना बसला विजेचा धक्का

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
10th July, 11:35 am
अस्नोडा येथे विजेच्या धक्क्याने घेतला कर्मचाऱ्याचा बळी

डिचोली : बार्देश तालुक्यातील (Bardez Taluka) अस्नोडा येथे काम करत असताना विजेचा धक्का लागून वीज कर्मचारी मंथन आरोस्कर (वय ३०, रा. म्हावळ‌िंगे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘ड्युटी’ बजावत असताना त्यांना विजेचा तीव्र झटका बसला. त्यात या युवकाचा अकाली बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, मंथन आरोस्कर हेझाडांच्या फांद्या कापत होते.त्यावेळी त्यांनाअचानक विजेचा तीव्र धक्काबसला. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत्यू नेमका कशा परिस्थितीत झाला याचा तपास सुरू आहे. वीज खात्यानेही (Electricity Department, Goa)  घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी कोलवाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा