भरधाव रेंट अ कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पणजी : रेंट अ कार (rent a car) चालकांच्या बेदरकारपणामुळे अपघात सुरूच आहेत. गोवा वेल्हा-बांबोळी मार्गावर (Goa Velha to Bambolim) रेंट अ कार (rent a cab) आणि दुचाकीच्या अपघातात (accident) दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी रात्री घडला.
एका भरधाव रेंट अ कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचेही मोठे नुकसान झाले. कारमधील एअरबॅग्ज उघडल्यामुळे चालक बचावला. कारच्या धडकेत दुचाकी रस्त्यालगतच्या सुरक्षा कुंपणाला धडकून गवतात जाऊन पडली. कारची नंबर प्लेट दुचाकीच्या आत अडकलेली दिसून आली. यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.