Home >> गुन्हे >> ८५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार; गुन्हा नोंद

८५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार; गुन्हा नोंद

मायणा-कुडतरी पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
८५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार; गुन्हा नोंद

मडगाव : सासष्टी तालुक्यातील नुवे परिसरात एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी संशयित स्टॅनली कुतिन्हो याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच ७ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. संशयिताने पीडित महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिचा विनयभंग केला व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या सुनेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर मायणा-कुडतरी पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती संशयित स्टॅनली कुतिन्हो याच्याविरुद्ध बेकायदेशीर प्रवेश, बळजबरी आणि लैंगिक अत्याचार अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. संशयित स्टॅनली हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्यावर म्हापसा पोलीस ठाण्यात 'पोक्सो' (POCSO) अंतर्गत, तर वेर्णा पोलीस ठाण्यातही गुन्हा नोंद आहे.

घटनेनंतर पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांनी यावर अधिक माहिती देण्याचे टाळले आहे. मायणा-कुडतरी पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वेरोनिका कुतिन्हो पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा