कदंबा वाहतूक महामंडळाच्या विशेष बसगाड्या

पणजी : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वाऱ्या सध्या जय्यत तयारीत आहेत. पंढरपूरच्या वारीला वारकरी, भाविकांची मोठी गर्दी होत असते. जणू भक्तीचाच मेळा भरत असतो. टाळमृदुंगाच्या तालावर श्री विठ्ठल-रखुमाईच्या भक्तीत तल्लीन होऊन अनेक भाविक पंढरपूरच्या दिशेने जात असतात. गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात वारकरी, भाविकांचा मेळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कदंबा वाहतूक महामंडळाने (Kadamba Transport Corporation) गोवा ते पंढरपूर विशेष गाड्यांची सोय केली आहे. २४ व २५ जुलै असे दोन दिवस गोव्यातील विविध ठिकाणावरून या बसगाड्या सुटणार आहेत.
गोवा ते पंढरपूर कदंबा बसगाडीचे तिकीट ५०० रुपये आहे.
बसगाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
२४ जुलै रोजी
८.४५ वाजता मडगाव – पणजी - म्हापसा - पेडणे
११ वाजता वास्को - पणजी - म्हापसा - पेडणे
१२ वाजता मडगाव - फोंडा - मोले - बेळगावी
२५ जुलै रोजी
६.३० वाजता पणजी - म्हापसा - पेडणे - सावंतवाडी
८.४५ वाजता मडगाव – पणजी - म्हापसा - पेडणे
११ वाजता वास्को - पणजी - म्हापसा - पेडणे
११ वाजता पणजी - म्हापसा - साखळी - बेळगावी
१२ वाजता मडगाव - फोंडा - मोले - बेळगावी
१४.५० वाजता पणजी - म्हापसा - पेडणे - सावंतवाडी
अधिक माहितीसाठी कदंबा वाहतूक महामंडळाच्या जवळच्या तिकीट विक्री केंद्रावर संपर्क साधावा. किंवा वास्को : ९२२६५५८२२४६, फोंडा : ९२२६५८२२५१, मडगाव : ९२२६५८२२४५. या क्रमांकांवर संपर्क साधावा.