निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ-कनिष्ठ अधिकाऱ्यांत फेरबदल

वसंत दाभोलकर (आयएएस)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले असून आठ वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दशरथ रेडकर यांची पंचायत संचालकपदी, तर दीपक देसाई यांची समाजकल्याण खात्याच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरच ४१ कनिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पालिका मुख्याधिकारी आदींचा समावेश आहे. बार्देशचे उपजिल्हाधिकारी वसंत दाभोलकर (आयएएस) यांची उत्तर गोवा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपजिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
वरिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या
बदलीनंतरची पदे पुढीलप्रमाणे :
दीपक देसाई – संचालक, समाजकल्याण
दीपक बांदेकर – संचालक, नागरी विमान वाहतूक
दीपाली नाईक – संचालक, आरडीए (उत्तर डीआरडीए प्रकल्प संचालकाचा अतिरिक्त कार्यभार)
संगीता नाईक – प्रकल्प संचालक, डीआरडीए (दक्षिण) तसेच कुशावती प्रकल्पाचा कार्यभार
प्रेमराज शिरोडकर – एसएलएओ, जीआयडीसी
दशरथ रेडकर – पंचायत संचालक
वीरा नाईक – संचालक, स्मॉल सेव्हिंग्ज आणि लॉटरी
शर्मिला गावकर – अतिरिक्त निबंधक व नोटरी सेवा
४१ कनिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या
सरकारने उपजिल्हाधिकारी, पालिका मुख्याधिकारी यांच्यासह ४१ कनिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिवप्रसाद नाईक यांची उद्योग खात्याचे उपसंचालक, तर वर्षा परब यांची पेडणेच्या उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रमुख पुढीलप्रमाणे :
शिवप्रसाद नाईक – उपसंचालक, उद्योग व व्यापार
वर्षा परब – उपजिल्हाधिकारी, पेडणे
साबा परब – मुख्याधिकारी, डिचोली
विनायक चारी – उपजिल्हाधिकारी, बार्देश
जयेश मयेकर – उपसंचालक, सार्वजनिक बांधकाम तक्रार विभाग
पंकज मराठे – उपजिल्हाधिकारी, उत्तर गोवा
लक्ष्मीकांत देसाई – उपजिल्हाधिकारी, तिसवाडी
अमित सावंत – उपजिल्हाधिकारी (महसूल), उत्तर गोवा
प्रतीक पोरोब – डीआरओ, उत्तर गोवा
ईश्वर मडकईकर – मुख्याधिकारी, साखळी
शमा नार्वेकर – उपसंचालक, कला व संस्कृती
विपुल पार्सेकर – डेप्युटी रजिस्ट्रार, जीईसी फर्मागुडी
अवेलिनो परेरा – सहसचिव, राजीव कला मंदिर
नेहल तळवणेकर – उपसंचालक, आदिवासी कल्याण (दक्षिण) व कुशावतीचा कार्यभार
सूरज घैसास – प्रकल्प अधिकारी, डीआरडीए (दक्षिण) व कुशावती
भिकू गावस – उपजिल्हाधिकारी, दक्षिण गोवा व कुशावती
अमितेश शिरवईकर – उपजिल्हाधिकारी, केपे
मिलिंद्र वेळीप – मुख्याधिकारी, कुडचडे
विमोद दलाल – उपजिल्हाधिकारी, धारबांदोडा
मृणाल मराठे – उपजिल्हाधिकारी, सांगे
श्रीपाद माजिक – प्रकल्प अधिकारी, डीआरडीए उत्तर
सुयश खांडेपारकर – संयुक्त संचालक, माहिती व प्रसिद्धी
गीता गावकर – एसएलएओ, राष्ट्रीय महामार्ग
पांडुरंग ताळगावकर – उपसंचालक (प्रशासन), उद्योग व व्यापार
कल्पेश आमोणकर – उपसंचालक, नागरी पुरवठा
शांती हार्डिंग – प्रशासकीय अधिकारी, बालहक्क आयोग
योगिराज गोसावी – अतिरिक्त संचालक, नगरविकास
पंकज राणे – मुख्याधिकारी, केपे
प्रजीत चोडणकर – उपसंचालक (प्रशासन), सार्वजनिक बांधकाम विभाग
मनोहर कारेकर – उपनिबंधक, सहकारी संस्था
एम. एन. कळंगुटकर – उपनिबंधक, निबंधक व नोटरी सेवा
मेल्विन फालेरो – उपायुक्त, राज्य कर विभाग
अनंत मळीक – उपजिल्हाधिकारी, बार्देश
कौशिक देसाई – उपनिबंधक, सहकारी संस्था
संजीवनी सातार्डेकर – उपजिल्हाधिकारी, दक्षिण गोवा
गौरव गावकर – उपजिल्हाधिकारी, सासष्टी
राजेश साखळकर – मुख्याधिकारी, कुंकळ्ळी
अॅना पेस – उपजिल्हाधिकारी (डीआरओ)
शैलेंद्र देसाई – उपसंचालक, मत्स्यव्यवसाय
प्रीती मांद्रेकर – उपसंचालक, उच्च शिक्षण
डीओना परेरा – उपसंचालक, वाहतूक विभाग.
गोमेकॉचा नवा डीन कोण ?
गोमेकॉचे अधिष्ठाता (डीन) डॉ. जयप्रकाश तिवारी ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवाकाल संपला असला तरी त्यांना मुदतवाढ देण्यात येणार की नव्या डीनची नियुक्ती केली जाणार, याबाबतचा आदेश अद्याप जारी झालेला नाही. नव्या डीनबाबत लवकरच आदेश अपेक्षित असून, मुदतवाढ किंवा नव्या नियुक्तीबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. यापूर्वी डॉ. शिवानंद बांदेकर निवृत्त झाल्यानंतर डॉ. जयप्रकाश तिवारी यांची डीन पदावर नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्या निवृत्तीनंतर गोमेकॉच्या नेतृत्वाची धुरा कुणाकडे जाणार, याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.