Home >> ताज्या बातम्या >> फुटबॉल सामन्यात ‘हेडर’ मारताना जखमी युवकाचा मृत्यू

फुटबॉल सामन्यात ‘हेडर’ मारताना जखमी युवकाचा मृत्यू

काणा बाणावली येथील दुर्घटना


30th June, 10:38 pm
फुटबॉल सामन्यात ‘हेडर’ मारताना जखमी युवकाचा मृत्यू

गोवन वार्ता प्रतिनिधी
मडगाव : बाणावली येथील दांडो मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल सामन्यादरम्यान ‘हेडर’ मारताना जखमी डायलॉन कार्व्हालो या युवकाचा मृत्यू होण्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युनायटेड बॉईज ऑफ आंबावली विरुद्ध गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लब कुडचडे यांच्यातील सामन्यादरम्यान हेडर मारण्याचा प्रयत्न करताना आंबावली येथील २६ वर्षीय तरुण डायलॉन नॅथॅलिनो कार्व्हालो हा मैदानात कोसळला.
स्पोर्टिंग क्लब ऑफ काणा बाणावली यांच्यावतीने या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युनायटेड बॉईज ऑफ आंबावली विरुद्ध गार्डियन एंजल स्पोर्ट्स क्लब कुडचडे यांच्यात सामना सुरू असताना डायलॉन याने फुटबॉलला ‘हेडर’ मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी समोरील खेळाडूला धडकून तो जमिनीवर कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. पोलीस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी कोलवा पोलीस पुढील तपास करत आहेत.