Home >> ताज्या बातम्या >> रेवोडा येथे स्वयंअपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

रेवोडा येथे स्वयंअपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह रस्त्यावर कोसळला


30th June, 10:36 pm
रेवोडा येथे स्वयंअपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू

गोवन वार्ता प्रतिनिधी
म्हापसा : रेवोडा येथे मोटारसायकल रस्त्यावर कोसळल्याने झालेल्या स्वयंअपघातात कुलदीप अजित फडते (२८, रा. फडतेवाडा रेवोडा) या दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला.
हा अपघात मंगळवारी सायं. ६.३० च्या सुमारास झाला. कुलदीप फडते आपल्या मोटारसायकलवरून घरी जात होता. वाटेत युनियन बँक शाखेजवळ त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व तो दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. या अपघातात कुलदीप गंभीर जखमी झाला. लोकांनी त्याला तत्काळ रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कोलवाळ पोलीस उपनिरीक्षक विष्ण जाधव व साहाय्यक उपनिरीक्षक अनिल पिळगावकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

काही दिवसांपूर्वी त्याच जागी कुलदीपचा स्वयंअपघात 

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आठ दिवसांपूर्वी त्याच जागेवर कुलदीपला रात्रीच्या वेळी स्वयंअपघात झाला होता. त्यावेळी तो गंभीर जखमी झाला होता. त्याला जिल्हा रुग्णालयातून गोमेकॉत पाठवले होते. तेथे उपचार घेऊन दोन दिवसांपूर्वी तो घरी आला होता. मंगळवारी नेमका त्याच जागेवर अपघात होऊन त्याचा दुर्दैवी अंत झाला.