Home >> गुन्हे >> मडगाव रेल्वे स्थानकावर १५ लाखांचा गांजा जप्त; एनसीबीची कारवाई

मडगाव रेल्वे स्थानकावर १५ लाखांचा गांजा जप्त; एनसीबीची कारवाई

एकाला अटक : एक अल्पवयीन मुलगा ताब्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 mins ago
मडगाव रेल्वे स्थानकावर १५ लाखांचा गांजा जप्त; एनसीबीची कारवाई

पणजी : केंद्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या गोवा विभागाने मडगाव रेल्वे स्थानकावर कारवाई करत बिहारहून रेल्वेने गोव्यात आलेल्या दोघांकडून १५ लाख रुपये किमतीचा १५ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी विकास कुमार (१९) याला अटक करण्यात आली असून, एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बिहारहून रेल्वेमार्गे गोव्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, २४ जून रोजी मडगाव रेल्वे स्थानकावर सापळा रचण्यात आला होता. सकाळी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर एनसीबी पथकाने रेल्वेची झडती सुरू केली. यावेळी दोन युवक संशयास्पद हालचाली करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांच्याकडून १५ किलो गांजा जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत दोघेही बिहारहून गोव्यात आल्याचे समोर आले. त्यापैकी एक युवक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले, तर दुसऱ्याची ओळख विकास कुमार अशी पटली. एनसीबीने दोघांविरोधात गुन्हा नोंद करून विकास कुमार याला अटक केली. त्यानंतर दोघांना मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.

हेही वाचा
सर्व पहा