
एका घरात चार बोकडं राहत होती. चारही बोकडं शांत स्वभावाची होती. स्वभावात गोडवा फार होता, पण दैवाची जन्मजात साथ कमी मिळाली होती.
चारही बोकडांना एक व्यंग होते. प्रत्येकाचे व्यंग वेगळे होते, तरी चारही एकमेकांना मदत करत असत. मजेत राहत असत. व्यंग असूनही ती चारी बोकड इतरांप्रमाणे आपली कामे आनंदाने करत असत.म्हणजे एक काही व्यंग नसलेला जीव कसा काय करू शकतो तसेच होते.
पहिल्या बोकडाला नीट दिसत नव्हते. दुसऱ्या बोकडाला ऐकू कमी येत होते. तिसरे बोकड एका पायाने लंगडे होते. चौथ्या बोकडाला बोलता येत नव्हते.
म्हणून ही चारही बोकड ना भिता कुठेही सैर करत होती. चारा खात होती. कधी रस्त्याच्या कडेला तर कधी माळरानात, तर कधी बागायतीत. हेच उद्योग होते.
एके दिवशी चारही बोकडं कुरणात गवत खाण्यासाठी गेली. हिरवेगार गवत पाहून ती आनंदाने चरू लागली. इ
मात्र जवळच्या झुडपात एक लांडगा दबा धरून बसला.
लांडगा आज एकाला पकडणारच म्हणून निश्चय करून दबा धरून बसलेला. लांडगा हळूहळू त्यांच्या दिशेने येऊ लागला.
दूरवर पाहणाऱ्या दुसऱ्या बोकडाने लांडग्याला पाहिले. पण त्याला ऐकू कमी येत असल्याने इतरांना हाक मारता येईना. त्याने लगेच पायाने जमीन आपटायला सुरुवात केली.
आवाज ऐकून ऐकू कमी येणाऱ्या बोकडाशिवाय बाकी तिघांनी त्याच्याकडे पाहिले. बोलता न येणाऱ्या बोकडाने हातवारे करून झुडपाकडे बोट दाखवले.
नीट दिसत नसलेल्या बोकडाला काहीच समजेना. तेव्हा लंगड्या बोकडाने त्याला अलगद ढकलून सुरक्षित दिशेला नेले. आणि नेहमीच्या सवयीला जाग आली. ती सारीच हुशार होती.
क्षणात सगळ्यांना धोका समजला. चारही बोकडं एकत्र झाली. त्यांनी धैर्याने शिंगे पुढे केली. चार जण एकत्र उभे असल्याचे पाहून लांडगा घाबरला आणि तिथून पळून गेला. एकत्रीत पण कामाला आले होते, म्हणूनच
संध्याकाळी घरी परतताना चारही बोकडं आनंदात होती.
पहिले बोकड म्हणाले, "मला नीट दिसत नसले तरी तुमच्या डोळ्यांनी मला वाचवले."
दुसरे म्हणाले, "मला ऐकू कमी येते, पण तुमच्या संकेतांनी मला सर्व समजले."
तिसरे म्हणाले, "माझा पाय कमजोर असला तरी तुमच्या आधाराने मी मजबूत आहे."
बोलता न येणारे चौथे बोकड काही बोलू शकले नाही, पण त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू चमकत होते.
त्या दिवसापासून चारही बोकडांची ही गोष्ट ज्यांनी ज्यांनी पाहिली त्यांनी आपल्या डोक्यातघट्ट पकडून ठेवली. त्यांना ही कळले की कुणी धनधाकट असो किंव्हा अशक्त असो, एकत्रित राहिलो तर कुणी शत्रू जिंकू शकत नाही.
"व्यंगामुळे माणूस किंवा प्राणी कमी होत नाही; एकमेकांची साथ, प्रेम आणि सहकार्य यामुळेच खरी ताकद निर्माण होते. तेच मोठे बळ असते."
बोध: संकटाच्या खरा पराभव एकतेचे प्रतीक आहे.

सोनाली सु. पेडणेकर