Home >> गोवा >> जंगली प्राण्यांसहीत वन्य जीवांच्या हालचालींवर देखरेख ठेवून होणार अभ्यास:वनमंत्री विश्वजीत

जंगली प्राण्यांसहीत वन्य जीवांच्या हालचालींवर देखरेख ठेवून होणार अभ्यास:वनमंत्री विश्वजीत

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
10th June, 03:10 pm
जंगली प्राण्यांसहीत वन्य जीवांच्या हालचालींवर देखरेख ठेवून होणार अभ्यास:वनमंत्री विश्वजीत

पणजी : बिबटे, गवे रेडे तसेच इतर प्राणी, जनावरे लोकवस्तीत यायला लागली आहेत. प्राणी तसेच जंगलातील जनावरांच्या हालचालींवर कॅमेराच्या माधम्यातून देखरेख ठेवून अभ्यास करण्यात येणार आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यामधील संघर्षाचा अभ्यास होणार. यासाठी प्राण्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवणार,अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. 

वनमंत्री विश्वजीत राणे (Minister Vishwajit Rane)  यांनी वन खात्याच्या (Forest Department)  अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. या दिवसांत गव्या रेड्यांनी माणसावर हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. बिबटे मृत्यू पावले आहेत. यासाठी ठरावीक परिसरात कॅमेरे बसवून वन्य जीवांच्या हालचालींचा अभ्यास करणार. हा अभ्यास झाल्यानंतर वन्य जीवांसाठी खास कॉर‌िडोर तयार करण्याचा प्रस्ताव आहे. 

गेल्या वर्षी वन खात्याने पावसाळ्यात ६ लाख झाडे लावली होती. त्यातील ७० टक्के झाडे जीवंत आहेत. यावर्षी ‘एक पेड मॉं के नाम’ उपक्रमाखाली ५ लाख झाडे लावण्याचे ध्येय आहे. पावसाळ्यात तसेच इतर दिवसांत पर्यटक तसेच इतर लोक जंगल परिसरात ट्रेकिंग तसेच सहलींचे आयोजन करतात. यापुढे सहली तसेच ट्रेकिंगसाठी वन संरक्षकाची परवानगी घ्यावी लागणार. जंगलातील तलाव तसेच जलस्त्रोतांचा शोध घेऊन त्यांचे संवर्धन करण्याविषयी बैठकीत चर्चा झाली.