पणजी पोलिसांची कारवाई

पणजी : पणजी पोलिसांनी ताळगाव परिसरात छापा टाकून सुमारे १ किलो गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत १ लाख रुपये इतकी आहे.
या प्रकरणी सुधामा कुमार (२२, रा. नागाळी, ताळगाव; मूळ बिहार) याला अटक करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. संशयिताकडून गांजा ताब्यात घेण्यात आला आहे. पणजी पोलीस पुढील तपास करत आहेत. संबंधित अंमली पदार्थाचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.