तोरसेतील डेकोरेशन साहित्याचे गोदाम फोडून २ लाखांच्या साहित्याची चोरी

अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांत तक्रार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
तोरसेतील डेकोरेशन साहित्याचे गोदाम फोडून २ लाखांच्या साहित्याची चोरी

पणजी: तोरसे येथील शेट्येवाडा परिसरात एका डेकोरेशन साहित्याच्या गोदामात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  अज्ञात चोरट्याने गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सुमारे २ लाख रुपये किमतीचे डेकोरेशन साहित्य लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक व्यावसायिक प्रकाश शेट्ये यांच्या मालकीच्या डेकोरेशन साहित्याच्या गोदामामध्ये ही चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्याने गोदाम फोडून आत असलेले किंमती साहित्य चोरून नेले. 

या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या चोरीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना (Pernem Police) देण्यात आली आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

गस्त वाढवण्याची मागणी 

दरम्यान, परिसरात रात्रीच्या गस्तीत वाढ करून अशा घटनांना आळा घालण्याची मागणी स्थानिक नागरिक व व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा
सर्व पहा