उपेंद्र गावकरांच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा आणखी एक कारनामा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th June, 11:45 pm
उपेंद्र गावकरांच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा आणखी एक कारनामा

डिचोली : शिवसेना शिंदे गटाचे नेते उपेंद्र गावकर यांच्या घरात घुसून गोळीबार, तोडफोड केलेल्या प्रज्योत लक्ष्मण गावकर व गिरीश लक्ष्मण गावकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. पैरा येथील उत्तम पोळे बार अँड रेस्टॉरंटमध्ये एकाला मारहाण केल्याप्रकरणी डिचोली पोलीस स्थानकात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यदुवीर मधुकर गावकर (४४, रा. मधलावाडा, शिरगाव) हे ५ जून रोजी रात्री ९ वाजता मित्रांसमवेत बारमध्ये बसले होते. यावेळी प्रज्योत लक्ष्मण गावकर (४२) हा त्यांच्या टेबलाजवळ येऊन बोलून निघून गेला. त्यानंतर तक्रारदार बिल मागत असताना गिरीश लक्ष्मण गावकर (४३) याने त्यांचा टी-शर्ट पकडून खाली ढकलल्याचा आरोप आहे.

प्रज्योत गावकर यानेही शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली तसेच बंदुकीच्या बॅरलने तक्रारदाराच्या कपाळावर मारहाण केल्याने त्यांना दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी स्कूटरवरून पसार झाले.

या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

हेही वाचा