वेर्णा येथे वाहनाच्या धडकेत पाच गायींचा मृत्यू, एक गंभीर जखमी

वाहन चालकाला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
57 mins ago
वेर्णा येथे वाहनाच्या धडकेत पाच गायींचा मृत्यू, एक गंभीर जखमी

वास्को : वेर्णा येथे रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या गुरांच्या कळपाला एका भरधाव वाहनाने धडक दिल्याने पाच गायींचा मृत्यू झाला तर एक गाय गंभीर जखमी झाली. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे. 

शुक्रवारी मध्यरात्री वरील अपघात घडला.  गुरांचा कळप रस्त्यावर ठाण मांडून होता. अवजड वाहनाची धडक बसल्याने त्यातील पाच गायी (Cow) मृत्युमुखी पडल्या तर एक गाय गंभीर जखमी झाली. जखमी गायीला जेकेएसएस गट, परशुराम गोमंतक गोशाळा सदन आणि डीएसपीसीए (DSPCA) यांच्या मदतीने ध्यान फाउंडेशनमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन चालकाला ताब्यात घेतले. दक्षिण गोव्यातील डीएसपीसीएचे पदाधिकारी राज प्रतीक यांनीही घटनास्थळी भेट देऊन पर‌िस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस (Goa Police) करीत आहेत. 

हेही वाचा