चालकाविरोधात गुन्हा दाखल

वास्को : आल्त-मांगोरहिल येथील ला-रोझ इमारतीसमारे शनिवारी दुपारी एका थार जीपने ठोकरल्याने सासमोळे बायणा येथील गेनादेवी जैस्वाल ही मरण पावली. वास्को पोलिसांनी या अपघातप्रकरणी पंचनामा केला. बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन हाकून गेनादेवीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या थारचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ३०) दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान थारचालक तानिया हॉटेल येथून मांगोरहिल चौकाकडे निघाला होता. सदर थार जीप आल्त-मांगोरहिल येथील ला-रोझ इमारतीसमोर पोहचली असता तिची धडक समोरून पायी चालत शहर भागाकडे जाणाऱ्या गेनादेवीला बसली. या धडकेमुळे गेनादेवी रस्त्यावर पडली. तिच्या डोक्याच्या मागील भागास दुखापत झाल्याने तिला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर तिला एका खासगी इस्पितळात व तेथून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचे निधन झाले. याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक आकांक्षा फडते देसाई पुढील तपास करीत आहे.
https://goanvarta.net/story.php?id=79465
शिर्ली येथील हिट-अँड-रन प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद
https://goanvarta.net/story.php?id=79494
शिवोलीत 'रेंट अ कॅब' थारची धडक; युवक ठार, अल्पवयीन जखमी