'अतिथी देवो भव' संस्कृती जपण्याचे आवाहन

गोव्यातील वाढत्या वादांवर वाचकांचा कौल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st May, 11:48 pm
'अतिथी देवो भव' संस्कृती जपण्याचे आवाहन

'अतिथी देवो भव' ही संस्कृती जपणांऱ्या आणि जागतिक पर्यटन नकाशावर अग्रस्थानी असलेल्या गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला गेल्या काही दिवसांत घडलेल्या लागोपाठच्या घटनांमुळे मोठा धक्का बसला आहे. मांद्रे येथे सावंतवाडीतील पर्यटकांना झालेली बेदम मारहाण आणि त्यानंतर दक्षिण गोव्यातील कोलवा येथे पर्यटकांच्या हॉटेल रूममध्ये कर्मचाऱ्यानेच 'मास्टर की'चा वापर करून जबरदस्तीने घुसण्याचा केलेला धक्कादायक प्रयत्न, या दोन्ही घटनांमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून गोमतंकीयांना 'अतिथी देवो भव' संस्कृती जपण्याचे आवाहन केले आहे. याच अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर ‘दै. गोवन वार्ता’ने ‘चर्चेची वार्ता’मधून आपल्या सजग वाचकांचे विचार आणि मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

मी गोव्यात ६ वर्षे काम केले आहे. मी अनेकांना मारहाण करताना बघितले आहे. यामध्ये पर्यटकांचाही समावेश होता त्यांना लुटतानाही मी बघितले आहे.
-प्रशांत चौधरी


गोवा हा उद्धट आणि पद्धत नसलेल्या पर्यटकांसाठी धोकादायक आहे, चांगल्या वागणुकीच्या पर्यटकांचे गाेव्यात स्वागत आहे.
-मनोज नाईक


खरे तर भारतातील पर्यटक थोडे पैसे घेऊन येतात आणि बिल पाहिल्यावर गोंधळात पडतात व वेटर्सशी भांडण करतात.
-मुकेश आसवेकर


गोव्यामध्ये आता फक्त दारू आणि धिंगाणा, एवढेच उरले आहे.
-राजेश कामत


भिवपाची गरज ना (घाबरण्याची अजिबात गरज नाही). घाबरू नका, उद्धट पर्यटकांवर होणार कडक कारवाई. गोल्डन गोवा पर्यटन!
-प्रशांत गडकर


मराठी लोकांना गोव्यात ‘घाटी’ म्हटले जाते.
-महेंद्र मोहिते


गोवा पर्यटनावर अवलंबून आहे. स्थानिक लोकांनी शेजारील जिल्ह्यातील लोकांसोबत चांगले संबंध ठेवायला हवेत.
-नितीन गावडे


दोन वाईट घटना आणि येणारे पर्यटक दोन लाख! कुणा कुणाला थांबवणार?
-शेखर पणशीकर
याला दारू कारणीभूत. अनेक पर्यटक केवळ यासाठीच गोव्यात येतात आणि धिंगाणा घालतात, ते कोणाची तमा बाळगत नाहीत.
-श्रीकांत भोबे


महाराष्ट्रातील लोकांनी गोव्यात जाणे पूर्णतः बंद करावे.
गणेश शिंगारे 

हेही वाचा