निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता नायजेरियन 'छोटा पुढारी'; पण शिक्षकाने केला गेम

१६ वर्षांच्या मुलाचे कारनामे पाहून नेटकरीही अवाक. काय प्रकरण ? वाचा.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
57 mins ago
निवडणूक लढवण्याच्या तयारीत होता नायजेरियन 'छोटा पुढारी'; पण शिक्षकाने केला गेम

आबुजा : आफ्रिकेच्या खंडातील अजब राजकारण्यांच्या गजब कारनाम्यांची चर्चा जगभरात नेहमीच होते. आता नायजेरियातील एका छोट्या पुढाऱ्याचा किस्सा प्रसिद्ध झाला आहे.  ३० वर्षांचा असल्याचा दावा करणाऱ्या या उमेदवाराचे वय प्रत्यक्षात अवघे १६ वर्षे असल्याचे उघडकीस आल्याने संपूर्ण नायजेरियात खळबळ उडाली आहे. अखेरच्या क्षणी त्याच्या जुन्या शिक्षकाने केलेल्या एका विधानाने या प्रकरणाला नाट्यमय वळण दिले. एका मोठ्या राजकीय पक्षाची फसवणूक होता राहिली.


Who is Mahmud Sadis Baba, Nigerian politician resigns after 'passport leak' suggests  he is 16


"मी ३० वर्षांचा 'तरुण' आहे!"

नायजेरियातील कदुना राज्यातील सादिस बुबा (वय १६) हा तरुण 'अबिन अल-अजाबिन जजौ' म्हणजेच 'जारियाचे आश्चर्य' या टोपणनावाने ओळखला जातो. आधी वाहनचालक म्हणून काम केले आता देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे असे म्हणत महमूदने नायजेरियातील सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष 'ऑल प्रोग्रेसिव्ह काँग्रेस' (APC) कडून २०२७ च्या संसदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. पक्षाच्या स्क्रीन कमिटीसमोर मुलाखत देताना त्याने, माझा जन्म २ ऑगस्ट १९९५ रोजी झाला असून मला बुटकेपणाचा आजार आहे, त्यामुळे मी लहान मुलासारखा दिसतो, अशी भावनिक कहाणी ऐकवली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला. अनेक जण त्याला सर्वसामान्यांचा नवा नेता मानू लागले.


However, images of a passport, NIN slip, birth certificate and school records reportedly suggested that he was born in 2010 rather than 1995. If the documents are aiuthentic, Baba would reportedly be only 15 or 16-year-old, ineligible to contest Nigeria’s National Assembly elections. (Image: Instagram)


नयजेरियाच्या कायद्यानुसार संसदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान २५ वर्षे असणे बंधनकारक आहे. महमूदची वाढती लोकप्रियता पाहून पक्षाकडून त्याची उमेदवारी जवळपास निश्चित झाली होती. मात्र, हीच लोकप्रियता त्याच्या अंगलट आली. सोशल मीडियावरील काही जागरूक युजर्सनी त्याचे आंतरराष्ट्रीय पासपोर्ट, जन्मदाखला, राष्ट्रीय ओळखपत्र आणि शाळेचे रेकॉर्ड्स शोधून काढले. या अधिकृत कागदपत्रांनुसार महमूदचा जन्म २०१० मधील असल्याचे समोर आले. म्हणजेच त्याचे वय ३० नसून केवळ १६ वर्षे होते.


Initially, the APC defended Baba and described the allegations as political propaganda aimed at damaging his image. However, as more evidence surfaced online, the party eventually disqualified him over age falsification. (Image: Instagram)


...आणि शिक्षकांनी सगळाच 'गेम' उलटवला!

या वादात सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा महमूदचे जुने शिक्षक प्रसारमाध्यमांसमोर आले. मी काही वर्षांपूर्वीच महमूदला ज्युनिअर हायस्कूलमध्ये शिकवले आहे, तो अजूनही अल्पवयीन आहे, असा थेट दावा शिक्षकाने केला. यानंतर पक्षाने विरोधकांचा डाव म्हणून सुरुवातीला महमूदची पाठराखण केली, पण पुराव्यांचा ओघ वाढल्याने अखेर पक्षाला माघार घ्यावी लागली.


After the controversy escalated, Baba announced his withdrawal from the election race through a formal letter addressed to the APC chairman. In the letter, he said he decided to step down following reconciliation efforts by party leaders and stakeholders. (Image: Instagram)


चौफेर कोंडी झाल्यानंतर पक्षाने महमूदची हकालपट्टी केली. त्यानंतर महमूदनेही एक अधिकृत पत्र लिहून आपली उमेदवारी मागे घेतली आणि दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला. हा संपूर्ण प्रकार केवळ नायजेरियातच नव्हे, तर संपूर्ण आफ्रिकेत चर्चेचा विषय ठरला असून, एका मोठ्या राजकीय पक्षाने उमेदवाराच्या वयाची साधी पडताळणीही कशी केली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा