कर्नाटक: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; नवा मुख्यमंत्री ‘हाय कमांड’ ठरवणार : सिद्धरामय्या

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
कर्नाटक: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार; नवा मुख्यमंत्री ‘हाय कमांड’ ठरवणार : सिद्धरामय्या

बेंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली. यामुळे राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये नेतृत्व बदलाची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिद्धरामय्या यांच्या निर्णयानंतर आता कर्नाटकच्या पुढील मुख्यमंत्रिपदाबाबत उत्सुकता वाढली आहे. काँग्रेस हायकमांड पुढील मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही पुढील निर्णय ‘हाय कमांड’ घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. विविध नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काही दिवसांत हायकमांडकडून महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा