गोवा पोलीस खात्यातील १४ पोलीस निरीक्षकांची बदली

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
2 hours ago
गोवा पोलीस खात्यातील १४ पोलीस निरीक्षकांची बदली

पणजी : गोवा पोलीस खात्यात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार, १४ पोलीस निरीक्षकांची बदली केली आहे. कृष्णा सिनारी यांची हणजूण, राहुल नाईक यांची फातोर्डा, विद्धेश शिरोडकर यांची कोलवा, विद्धेश पिळगावकर यांची वाळपई पोलीस स्थानकात बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश मुख्यालयाचे अधीक्षक तुषार वेर्णेकर यांनी जारी केला आहे.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांची हणजूण पोलीस स्थानकात बदली केली आहे. तसेच राहुल नाईक यांची फातोर्डा, विद्धेश शिरोडकर यांची कोलवा, विद्धेश पिळगावकर यांची वाळपई पोलीस स्थानकात बदली करण्यात आहे. याशिवाय पोलीस निरीक्षक अरुण बाक्रे यांची डिचोली वाहतूक विभागात, चंद्रकांत गावस यांची सायबर विभागात, अॅडविन डायस यांची पोलीस नियंत्रण कक्ष, निखील पालेकर यांची गुन्हा शाखेत, ऋषिकेश पाटील यांची डिचोली विशेष विभागात, श्रीकांत पेडणेकर एस्कोर्ट विभाग म्हापसा, सुजय कोरगावकर यांची सायबर विभागात, सूरज गावस यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र वाळपई, विक्रम नाईक यांची कोकण रेल्वे स्थानकात तर वीरेंद्र वेळुस्कर यांची गोवा पोलीस कल्याण सोसायटीत बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा