बेळगावीतून राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून डॉ. अंजली निंबाळकर, ॲड. मोहन कटारकी यांच्या नावाची चर्चा

मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुनरागमन राज्यसभेत निश्चित; भाजप-जेडीएस आघाडीकडून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 mins ago
बेळगावीतून राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून डॉ. अंजली निंबाळकर, ॲड. मोहन कटारकी यांच्या नावाची चर्चा

बेळगावी : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात (Rajyasabha election in Karnataka) राजकीय हालचालींना वेग आला आहे.  बेळगावी जिल्ह्याने (Belgavi District)  आपली मजबूत दावेदारी पुढे केली आहे. काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील मोहन कटारकी   आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

कर्नाटकमधील चार राज्यसभा जागांसाठी लवकरच निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे.  काँग्रेसला तीन जागा जिंकण्याची स्पष्ट संधी असल्याचे राजकीय गणित सांगत आहे. विधानसभेत १३५ आमदारांचे संख्याबळ असल्याने काँग्रेस मजबूत स्थितीत आहे, तर चौथी जागा भाजपच्या खात्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मल्लिकार्जुन खर्गे यांचे राज्यसभेत पुनरागमन  निश्चित

एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे राज्यसभेत पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे. उर्वरित दोन जागांसाठी काँग्रेसमध्ये मोठी चुरस सुरू असून; मोहन कटारकी (Adv. Mohan Katarki)  यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांनी सांगितले. आंतरराज्य नदी पाणी वादांमध्ये कर्नाटकासह अनेक राज्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडल्यामुळे कटारकी यांना मोठा अनुभव आहे.

डॉ. अंजली निंबाळकरही शर्यतीत

दुसरीकडे, खानापूरच्या माजी आमदार आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. अंजली निंबाळकर (Dr.Anjali Nimbalkar) यांची दिल्लीतील राजकीय वर्तुळात वाढती उपस्थितीही चर्चेचा विषय ठरत आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी वाढलेले निकट संबंध लक्षात घेता महिला कोट्यातून त्यांना राज्यसभेत संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बेळगावातील काँग्रेस नेत्यांकडून मोहन कटारकी यांच्या उमेदवारीसाठी जोरदार पाठिंबा दिला जात असून, राज्यसभेत केवळ राजकारणीच नव्हे तर राज्याच्या नव्हे तर राज्याच्या हितासाठी लढणाऱ्या तज्ज्ञांनाही संधी मिळायला हवी, अशी भूमिका मांडली जात आहे.

भाजप-जेडीएस आघाडीकडून देवेगौडा यांच्या नावाची चर्चा 

दरम्यान, भाजप-जेडीएस आघाडीकडून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नावही चर्चेत आहे. भाजपकडून माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांचाही विचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा