
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र सावंत रविवारी सायंकाळी बार्देशमधील सेंट ख्रिस्तोफर चर्चजवळील नदी परिसरात मासेमारीसाठी गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, नदीच्या काठावर त्यांची मासेमारीची काठी आढळून आल्याने; पाण्यात बुडाल्याचा संशय अधिक गडद झाला होता. त्यानंतर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र सापडू शकले नव्हते. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे थिवी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून; पोलिसांनी (Goa Police) पुढील तपास सुरू केला आहे.