
पणजी : आवक कमी झाल्याने पणजी बाजारात विविध भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. अशातच कर्नाटकमध्ये अवकाळी पाऊस (Pre-monsoon rain in Karnataka) पडल्याने आवक आणखी कमी होऊन भाज्यांचे दर पुन्हा वाढले आहेत.
सोमवारी पणजी बाजारात (Panjim Market) वालपापडी दर ३० रुपयांनी वाढून २८० रुपये किलो झाले. टोमॅटोचे दर वाढून ६० रुपये किलो झाले. लिंबू १० रुपयेला एक या दराने विकला जात होता. तर भेंडीचे दर वाढून १०० रुपये किलो झाले. पुढील काही दिवस भाज्यांचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे.
पणजी बाजारात (Panjim vegetable market) बटाट्याचे दर १० रुपयांनी वाढून ५० रुपये किलो झाले. कोथिंबीरची जुडी ४० रुपये होती. कांदा ४० रुपये किलो होता. दोडका, गाजर, कारले प्रत्येकी ८० रुपये किलो दराने विकले जात होते.
गवारचे दर वाढून १०० रुपये किलो झाले. वांगी आणि काकडीचे दर प्रत्येकी ६० रुपये किलो होते. मोठी वांगी ८० रुपये किलो होती. कोबी ५० रुपये किलो तर फ्लॉवर ४० रुपये प्रती नग होता. याशिवाय पुदिना १५ रू., मेथीची जुडी १५ रुपये होती. आले २५० रुपये किलो झाले.
बाजारात मिरची ८० रू. तर ढब्बू मिरची १२० रुपये किलो होती. मानकुराद आंबा आकारानुसार २०० ते ५०० रुपये डझन या दरात विकले जात होते. तर हापूस आंबा ५०० ते ८०० रुपये डझन होते. जांभूळ २०० रुपये १०० नग, करवंद १०० रुपये वाटा या दराने विकले जात होते. बाजारात लहान नीर फणस ३०० रुपये तर मध्यम आकाराचा नीर फणस ५०० रुपये नग या दराने विकले जात होते.
फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवरील दर
फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा २३ रू, टोमॅटो ४६ रू तर बटाटा २४ रुपये किलो होता. तर भेंडी २० रू., कोबी २३ रू., गाजर ४० रू., वालपापडी १५५ रू., मिरची ४९ रुपये किलो दराने विकली जात होती. तर फ्लॉवरचे दर प्रती नग ३५ रुपये होते.