निंजा दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात धारबांदोडा येथे मालवाहू ट्रक उलटला

रस्त्यावर कुत्रा आडवा आल्यामुळे अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago

फोंडा : देवसडो-धारबांदोडा येथील धोकादायक वळणावर बुधवारी सकाळी दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात मालवाहू ट्रक उलटला. कावासाकी नींजा दुचाकीची धडक बसण्याची शक्यता असल्याने ट्रकचालकाने रस्त्याच्या बाजूला ट्रक घेतला असता तो उलटला. तरीही दुचाकीची धडक ट्रकला बसली. अपघातात दोन्ही चालक सुखरूप असून दुचाकीचे मोठे नुकसान झाले. रस्त्यावर कुत्रा आडवा आल्यामुळे अपघात घडला.

बुधवारी सकाळी मडगावहून किमती दुचाकी घेऊन चार-पाच मित्र मोले येथे गेले होते. मोलेहून शिगाव, किर्लपाल व कोडली मार्गाने धारबांदोडा येथे जात असता देवसडा येथील धोकादायक वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू ट्रकला दुचाकीची धडक बसली. मालवाहू ट्रक चालकाने दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्न केल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. यात कावासाकी नींजा दुचाकीचे अंदाजे १०-१२ लाख रुपयांचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलिसांनी अपघात स्थळावर जाऊन पंचनामा केला. 

हेही वाचा