अपघातातील जखमीचे गोमेकॉत निधन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th April, 11:59 pm
अपघातातील जखमीचे गोमेकॉत निधन

केपे : रिवणा सांगे येथे दि. १६ रोजी स्वयंअपघातात जखमी झालेले लक्ष्मण वेळीप (४७) यांचे गोमेकॉमध्ये उपचार चालू असताना शनिवारी निधन झाले.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण वेळीप हे मूळ कावरे गावचे रहिवासी आहेत. रिवणा सांगे येथे १६ रोजी रात्री मोटारसायकलवरून जाताना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर त्यांच्यावर गोमेकॉत उपचार चालू होते. शनिवारी, त्यांचे निधन झाले. 

हेही वाचा