
पणजी : येथील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये १०.९८ लाख रुपयांची टपाल तिकीट विक्रीची अफरातफर करण्यात आली. या प्रकरणी पणजी पोलिसांनी साहाय्यक कोषाध्यक्ष प्रवीण तेजराव लहाने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी उपपोस्टमास्तर मनीषा झगडे यांनी तक्रार दिली. त्यानुसार, पणजी मुख्य पोस्ट आॅफिसातील सहाय्यक कोषाध्यक्ष प्रवीण लहाने याने २५ जानेवारी २०२५ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत सरकारी टपाल तिकीट व सेवा तिकीटांची विक्री केली. त्याने लेखा नोंदींमध्ये गंभीर हलगर्जीपणा केला. तसेच संशयिताने सदर सॉफ्टवेअर तसेच नोंदवहीमध्ये योग्य नोंद केली नाही. rh कालावधीत त्याने सुमारे १० लाख ९८ हजार ७८५ रुपयांच्या निधीचा अफरातफर केल्याचे तक्रारीत नमूद केले.
याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन नाईक यांनी संशयित प्रवीण लहाने याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.