ग्राहकांच्या खिशावर परिणाम : भाजी-मासळीचे दर स्थिर, मानकुराद आंबा १ हजार रुपये प्रति डझन

म्हापसा : येथील बाजारपेठेत वाळलेल्या गावठी मिरचीसह मसाल्याच्या पदार्थांच्या दरात दुप्पट वाढ झाली असून, हे मसाल्याचे पदार्थ खरेदी करताना सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत.
हरमल आणि मयडेची मिरची २०० ते १६०० रुपये, काश्मिरी मिरची ८०० रुपये, गुंटर मिरची ३६० रुपये, बेडगी ५०० रुपये, कोथिंबीर २४० रुपये, खसकस २००० रुपये, मिरया १००० रुपये, हळद ३२० रुपये, बडीशेप ४०० रुपये, लवंग १५०० रुपये, वेलची ५,००० रुपये, मिरची पावडर ५०० रुपये, हळद पावडर ४०० रुपये, तेल २०० रुपये प्रति लिटर, खोबरेल तेल ३०० रुपये लिटर, टिकी (साल) ६०० रुपये, टिकी (पान) २०० रुपये, लसूण ३६० रुपये.
भाजीपाल्याचे प्रति किलो किरकोळ दर
टॉमेटो ४० रुपये, बटाटे ४० रुपये, कांदा ४० रुपये, गाजर ८० रुपये, वांगी ८० रुपये, ढब्बू मिरची ८० रुपये, कोबी ४० रुपये, कॉलिफ्लॉवर ३० रुपये, भोपळा ४० रुपये, चिटकी ५० रुपये, मिरची १०० रुपये, आले १०० रुपये, लसूण ३६० रुपये, भेंडी ८० रुपये, लिंबू ८-१० रुपये नग, पालक १५ रुपये जुडी, तांबडी भाजी २० रुपये जुडी, कोथिंबीर ३० रुपये जुडी, शेपू ३० रुपये जुडी, कांदा पात २० रुपये जुडी, मेथी २० रुपये जुडी, मका ५० रुपयांत तीन नग, कारले ६० रुपये, दोडके ८० रुपये, बीट ८० रुपये, वालपापडी १०० रुपये, वाल ८० रुपये, काकडी ४० रुपये, नारळ ३० ते ५० रुपये नग, मशरूम ५० रुपये, बेबीकॉर्न ५० रुपये, नीरफणस ४०० ते १५०० रुपये.
मासळीचे दर
मासळीमध्ये इसवण १२०० रुपये, चणाक ८०० रुपये, काळी पापलेट ७०० रुपये, पांढरी पापलेट १५०० रुपये, कोळंबी ५०० रुपये, कर्ली ४०० रुपये, बांगडा ३०० रुपये, टोकी ४०० रुपये, लेपो ४०० रुपये, खेकडे ४०० रुपये, खुबे-तिसऱ्या ३०० रुपये, वेर्ली ३०० रुपये, माणक्या ५०० रुपये, दोडयारे ४०० रुपये, मडसो ६०० रुपये, मुड्डुशो ८०० रुपये, तारली १०० रुपये.
चिकन २२० रुपये किलो, मटण १००० रुपये किलो व अंडी ८० रुपये डझन.
कडधान्य
तूरडाळ १४० ते १६० रुपये, चवळी १४० रुपये, मूग १२० रुपये, मसूर १०० रुपये, वाटाणे ८० रुपये, हिरवे वाटाणे १२० रुपये, हरभरे १०० रुपये, काबूल १४०, सोनामसुरी तांदूळ ५० रुपये, बासमती तांदूळ ५० ते १०० रुपये, गहू ४० रुपये, नाचणी ५० रुपये, साखर ५० रुपये, चहा पावडर २८० रुपये, आटा ४५ रुपये असे दर आहेत.
फळे
फळांमध्ये सफरचंद २०० ते २५० रुपये किलो, संत्रे २५० रुपये किलो, मोसंबी २०० रुपये किलो, पपई ६० रुपये किलो, द्राक्षे १८० ते २५० किलो किलो, पेरू १५० - २०० रुपये किलो. मानकुराद आंबा ७०० ते १२०० रुपये प्रति डझन, हाफूस आंबा १२०० रुपये प्रति डझन.
फुले
फुलांमध्ये झेंडू ६० रुपये, शेवंती ८० रुपये प्रति किलो असे दर होते.