मागील आठवड्यात जीवरक्षकांनी वाचवले ६ जणांचे प्राण!

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
34 mins ago
मागील आठवड्यात जीवरक्षकांनी वाचवले ६ जणांचे प्राण!

पणजीः जीवरक्षक आणि  बीच मार्शल यांनी आठवड्याच्या शेवटच्या रविवारपर्यंत गोव्यातील समुद्रकिनारे (Goa beaches) आणि दूधसागर धबधब्यावर झालेल्या १३ घटनांना प्रत‌िसाद दिला. त्यात सहा बचावकार्य, एक वैद्यकीय आपत्कालीन घटना, तीन हरवलेल्या मुलांचा शोध आणि चोरी रोखण्याच्या एका घटनेचा समावेश आहे. 

आश्वे समुद्रकिनाऱ्या दिल्लीच्या (Delhi)  ४३ वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर जीवरक्षकांनी लगेच घटना स्थळावर धाव घेऊन ऑक्सीजन (Oxygen) दिला. दुसऱ्या एका घटनेत आंध्र प्रदेशाच्या ३७ वर्षीय महिला आंघोळ करताना खोल पाण्यात गेली. त्यानंतर जीवरक्षकांनी तिला सुरक्षितपणे बाहेर काढले. 

हणजूण समुद्रावर हैदराबादचा (Hydrabad) १७ वर्षांचा मुलगा खोल पाण्यात अडकून राहिला. आणि बाहेर पडण्यास त्याला त्रास व्हायला लागला. जीवरक्षकांनी त्याला वाचवले. 

बागा येथे हरवलेल्या पाच वर्षांच्या मुलीला जीवरक्षकांनी शोधून तिला सुरक्ष‌ितपणे पालकांच्या स्वाधीन केले. कळंगूट (Calangute)  समुद्रावर बिहारचा २५ वर्षीय युवक दारूच्या नशेत पाण्यात गेल्यानंतर लाटांमध्ये अडकून पडला. जीवरक्षकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. दुसऱ्या एका घटनेत बेळगावच्या ४ वर्षांच्या हरवलेल्या मुलाला जीवरक्षकांनी शोधून काढून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.  

कोलवा समुद्रकिनाऱ्यावर कर्नाटकाची १५ वर्षांची मुलगी समुद्रात आंघोळ करताना पाणी आत गेले व तिला श्वास घेण्यास त्रास व्हायला लागला. जीवरक्षकांनी लगेच वैद्यकीय मदत देऊन तिला पुढील उपचारांसाठी आपत्कालीन यंत्रणेकडे पावठले. दुसऱ्या एका घटनेत बीच मार्शलांनी चोरी करून बॅग घेऊन पळत असलेल्या दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

तसेच बिहारच्या सहा वर्षांच्या हरवलेल्या मुलीला शोधून कुटुंबाकडे सुपूर्द केले. समुद्रकिनाऱ्यावर बीच मार्शलला हरवलेली चांदीची साखळी सापडली. मालक न सापडल्याने पोलिसांच्या स्वाधीन केली. 

बाणावली समुद्रकिनाऱ्यावर हरवलेला मोबाईल फोन तपासणीनंतर त्याच्या मालकाला दिला. पाळोळे समुद्रकिनाऱ्यावर फ्रांस येथील ६५ वर्षीय पर्यटक फिरताना खाली पडला. जीवरक्षकांनी त्याच्यावर उपचार केले. दूधसागर दबदब्यावर कोल्हापूरचा २८ वर्षीय पर्यटक लाईफ जॅकेट न घालता पाण्यात गेला व बुडायला लागला. जीवरक्षकांनी त्याला वाचवले. 

हेही वाचा