कुडचडे येथे टिप्पर-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th April, 11:45 pm
कुडचडे येथे टिप्पर-दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

सांगे : कुडचडेत रवींद्र भवनाच्या समोर रविवारी सकाळी ५.१५ वाजता झालेल्या अपघातात काऱ्यामड्डी काकोडा येथील स्कुटरस्वार जेस्वल डिनीज (१८) या युवकाचा मृत्यू झाला.

जेस्वल डिनीज हा बाणावली येथे हॉटेलमधे काम करीत होता. रात्रपाळीची आपली ड्युटी करून जी. ए. ०९ क्यू १०९० या क्रमांकाची मोटरसायकल घेऊन आंबेडकर सर्कलहून आपल्या घरी जात होता. यावेळी कुडचडे रवींद्र भवनाच्या समोरून टिप्पर ट्रक (जी.ए. ०९ यू ४३३१) घेऊन येणाऱ्या पेरीउदक येथील जलोटन फर्नांडिस यांची समोरासमोर धडक होऊन जेस्वल डिनीज गंभीर जखमी झाला. त्याला कुडचडे काकोडा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मडगाव जिल्हा हॉस्पिटलात नेण्यात आले. तिथे उपचार केल्यानंतर बांबोळी जीएमसीत नेण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. या प्रकरणाचा कुडचडेचे पोलीस उपनिरीक्षक भारत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे