चिखलीतील 'त्या' धोकादायक वळणावर पुन्हा अपघात; वीज खांबाला धडक देऊन कंटेनर उलटला

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 mins ago
चिखलीतील 'त्या' धोकादायक वळणावर पुन्हा अपघात; वीज खांबाला धडक देऊन कंटेनर उलटला

पणजी : दाबोळी-चिखली येथील अस्मा बार अँड रेस्टॉरंटजवळील धोकादायक वळणावर आज पहाटे एक भीषण अपघात घडला. एका भरधाव कंटेनर ट्रकने रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज खांबाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर तो रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातामुळे चिखली परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊन संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता.

ही घटना पहाटे ६:३५ च्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वास्को अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. सुदैवाने, या भीषण अपघातात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला असून मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र, वीज खांब कोसळल्याने नुकसान झाले आहे.

चिखलीतील हे वळण 'डेथ ट्रॅप' म्हणून ओळखले जाते. येथे वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आणखी किती बळी गेल्यानंतर सरकारला जाग येईल? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने (PWD) या धोकादायक वळणावर तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि रस्त्याची रचना दुरुस्त करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा केली जात आहे.


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा