शिरगाव जत्रा : गर्दी, सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्यासाठी खास नियंत्रण कक्ष

दोन दिवसांत होणार नियंत्रण कक्ष

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
21 mins ago
शिरगाव जत्रा : गर्दी, सुरक्षा व्यवस्थेच्या आढाव्यासाठी खास नियंत्रण कक्ष

पणजी : शिरगाव जत्रेला (Shirgao Jatra)  पहिल्या दिवशी होत असलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासहीत सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासनातर्फे खास नियंत्रण कक्ष स्थापन करणार. या नियंत्रण कक्षावर जत्रेच्या दोन दिवसांसाठी कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक होणार. आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास या नियंत्रण कक्षाद्वारे सर्व यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात येणार.

शिरगावच्या लईराई देवीची जत्रा २१ एप्रिलला होणार. गेल्या वर्षी चेंगराचेंगरी होऊन ६ जणांना मृत्यू आला होता. त्यामुळे यावर्षी सरकार तसेच प्रशासनाने साधनसुविधा तयार करण्याबरोबरच कठोर सुरक्षा उपाययोजना केली आहे. उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी (North Goa District Collector)  अंकीत यादव यांनी ही माहिती दिली.

नियंत्रण कक्षासाठी शेड उभारण्याचे काम सुरू झाले आहे. दोन दिवसांत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (PWD)  वतीने शेडीचे काम पूर्ण होणार. जत्रेच्या दिवशी ९२ जागांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची (CCTV Camera)  स्क्रीन नियंत्रण कक्षात असणार.

पोलीस महासंचालक, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी, मुख्य सचिव या सर्वांना पूर्ण परिसराच्या स्थितीचे दर्शन होणार. एखाद्या जागी गर्दी जास्त झाल्यास पोलीस निरीक्षकांना आदेश देऊन ती दूर करण्याची व्यवस्था होणार.   

हेही वाचा