
वाळपई : सत्तरी तालुक्यातील (Sattari Taluka) नानोडा येथे आंब्याचे झाड कोसळून शेड आणि पार्क केलेल्या कारचे मोठे नुकसान झाले. शेड आणि कार मिळून सुमारे १.३५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
घटनेनंतर वाळपई अग्निशमन दलाच्या (Valpoi fire station) जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कोसळलेले झाड कापून बाजूला करत परिसर सुरक्षित केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कुणाला गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेत १.३५ लाख रुपयांचे नुकसान झाले तर सुमारे ५ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले. वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी उमेश गावकर यांच्या नेतृत्त्वाखाली बी. एम. गावस, ए. जी. नार्वेकर इत्यादींनी या मोहीमेत भाग घेतला.