अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी तौफीकला १० वर्षांची सक्तमजुरी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
28 mins ago
अल्पवयीन मुलीवरील  बलात्कारप्रकरणी तौफीकला १० वर्षांची सक्तमजुरी

पणजी : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व बलात्कारप्रकरणात पणजीतील पॉक्सो न्यायालयाने (POCSO Court Panaji ) तौफीक कोतुर याला दोषी ठरवत १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. 

याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांची साधी कैद भोगावी लागणार आहे. वरील घटना २०२० साली घडली होती. याप्रकरणी वास्को पोलीस स्थानकात (Vasco Police Station) तक्रार नोंद झाल्यानंतर तपास केला होता.

उपअधीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्योती देसाई यांनी याप्रकरणाचा सखोल तपास केला होता. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्यात आल्याने, आरोपी तौफीक कोतुर याला दोषी ठरवत १० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. 

हेही वाचा