दिल्ली विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी

सुरक्षा वाढवली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
13th April, 05:23 pm
दिल्ली विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली (New Delhi) : दिल्ली विधानसभा (Delhi assembly)  बॉम्बने उडवून देण्याची धमकी पुन्हा एकदा देण्यात आली. सोमवारी अज्ञात व्यक्तीकडून ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा दलाने दिल्ली विधानसभेत धाव घेऊन तपासणी सुरू केली. आणि सुरक्षाही वाढवण्यात आली.

विधानसभेच्या परिसरात दिल्ली पोलीस (Delhi Police), बॉम्ब (Bomb) निकामी करणारे पथक, श्वान पथक (Dog Squad)  आणि अग्निशमन दलाची पथके तैनात करण्यात आली. विधानसभेचा संपूर्ण परिसर तपासून पाहण्यात आला. तपासणीत काहीही संशयास्पद आढळून आले नाही.

हेही वाचा