सौदी अरेबियात मुसळधार पावसाचा तडाखा; रियाधसह अनेक भागांत पूरस्थिती

धुळीच्या वादळाचाही तडाखा; शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
सौदी अरेबियात मुसळधार पावसाचा तडाखा; रियाधसह अनेक भागांत पूरस्थिती

रियाध : सौदी अरेबियातील (Saudi Arebia)  रियाध (Riyadh) आणि इतर अनेक भागांना मुसळधार पाऊस (Heavey rain) व पूरस्थितीचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्यांवर पाण्याचे प्रचंड प्रवाह वाहताना दिसले. ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नज्रान, मक्का, ईस्टर्न प्रॉव्हिन्स यांसह अनेक भागांत जोरदार पावसासोबत पूरस्थिती निर्माण झाली. सामाजिक माध्यमांवर रियाधमधील रस्त्यांवरून वेगाने वाहणाऱ्या पाण्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, पावसानंतर काही भागांत धुळीच्या वादळानेही परिस्थिती गंभीर केली. या वादळामुळे (Cyclone)  दृश्यमानता कमी झाली असून, मध्य व उत्तर भागांत वेगवान वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी अरेबियन गल्फ परिसरात वाऱ्याचा वेग ४५ किमी/ताशीपेक्षा अधिक नोंदवण्यात आला, तर रेड सी परिसरात तो ६० किमी/ताशीपर्यंत पोहोचला.

राष्ट्रीय हवामान खात्याने ‍‍दिलेल्या माहितीनुसार, रियाधमध्ये रविवारपर्यंत जोरदार पावसाचा प्रभाव राहणार असून; त्यानंतर हळूहळू परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सौदी सिव्हिल डिफेन्सच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

शाळा, महाविद्यालये बंद 

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देशातील शाळा (Schools) व महाविद्यालयांमधील (Colleges) प्रत्यक्ष वर्गांना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. अल-बाहा युनिव्हर्सिटी, किंग सऊद बिन अब्दुल अझीज युनिव्हर्सिटी फॉर हेल्थ सायन्सेस आणि किंग खालिद युनिव्हर्सिटी यांसारख्या विद्यापीठांमध्येही वर्ग बंद ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा