आंब्याची फांदी घरावर कोसळून पाच जण जखमी

तीन लहान मुलांचा समावेश

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
आंब्याची फांदी घरावर कोसळून पाच जण जखमी

पणजी : गोव्यातील (Goa) कोठारभाट–हळदोणा (Aldona) येथे सेंट थॉमस चर्चच्या आवारातील आंब्याच्या झाडाची (Mango tree)  मोठी फांदी अचानक तुटून जवळील घरावर कोसळल्याने एकूण पाच जण जखमी झाले. त्यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. जखमी मध्ये एका दीड वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. सर्वांना उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ)  दाखल करण्यात आले आहे. 

त्यांच्यावर गोमेकॉत (GMC) वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.  घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका आणि म्हापसा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजाऱ्यांनी जखमींना घरातून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून त्यांना प्रथम हळदोणा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. नंतर तिथून त्यांना पुढील उपचारार्थ गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले.

जखमी झालेल्यांत मूळ तामिळनाडू येथील मेरी (६०), दासलीन (२५), लायका (६), दिव्या (४), लिया  (दीड) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. ही दुर्घटना आज सोमवारी सकाळी ९.४० च्या सुमारास घडली. म्हापसा अग्निशमन दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी झाड कापून बाजूला केले. पुढील तपास म्हापसा पोलीस करत आहेत. दरम्यान, सेंट थॉमस चर्चचे केअरटेकर पीटर (रा. मूळ तामिळनाडू) हे आपल्या कुटुंबीयांसह चर्चच्या मालकीच्या या घरात राहत होते.


हेही वाचा