
पणजी : पर्वरी (Porvorim) परिसरातील एससीईआरटी (SCERT) जवळ सोमवारी (Monday) सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (Truck) दोन पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचा वेग अत्यंत जास्त होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघात झाल्याचे दिसताच याठिकाणी असलेले लोक धावून गेले.
त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले. रुग्णवाहिकेने गंभीर जखमी झालेल्यांवर प्रथमोपचार करून दोघांनाही इस्पीतळात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी ( Goa Police) घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास पर्वरी पोलीस करीत आहेत.