पेटके-धारबांदोडा येथील अपघातात स्कुटरचालकाचा मृत्यू

फोंडा-बेळगाव मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th April, 11:45 pm
पेटके-धारबांदोडा येथील अपघातात स्कुटरचालकाचा मृत्यू

फोंडा : पेटके-धारबांदोडा येथे शुक्रवारी रात्री कंटेनर आणि स्कुटर यांच्यात झालेल्या अपघातात गुरुदास वाडकर (६२, बेतकी-खांडोळा) या स्कुटर चालकाचा गाडीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी फोंडा - बेळगाव मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली.

एनएल ०१-एजे-२८१८ क्रमांकाचा कंटेनर मोलेहून पणजीच्या दिशेने जात होता. याचवेळी गुरुदास वाडकर हे धारबांदोडाहून फोंडा मार्गाने घरी जात होते. त्यावेळी अपघात घडला. स्कुटर चालक कंटेनरच्या टायर खाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यावर फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे व इतर कर्मचाऱ्यांनी अपघातस्थळावर धाव घेतली. फोंडा पोलिसांनी अपघताचा पंचनामा करून मृतदेह मडगाव येथील इस्पितळात पाठवला.

गुरुदास वाडकर यांनी नुकतेच पानस - साकोर्डा येथे घर बांधले होते. शुक्रवारी बेतकी येथे गावातील देवस्थानात वर्धापनदिन असल्याने पत्नी व मुले तिथे गेली होती. मूळ गावात वर्धापनदिन असल्यामुळे गुरुदास वाडकर हे स्कुटर घेऊन जात असताना अपघातात त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा