
पणजी : कुडचडे (Curchorem) लैंगिक अत्याचार (Sexual assault) प्रकरणी संशयित सोहम नाईकला (Soham Naik) केपे प्रथमवर्ग (JMFC Quepem) न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. क्राईम ब्रांचने काल त्याला तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली होती.
त्यानंतर संशयित सोहम नाईक याला आज शनिवारी केपे प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता; तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
१४ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी संशयित सोहम याला गुन्हा शाखेने काल पुन्हा अटक केली होती. आतापर्यंत त्याला तीन गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे. १४ वर्षीय मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार; संशयित सोहमने २०२४ ते २०२५ या कालावधीत इंस्टाग्राम या सोशल मीडियाद्वारे तिच्याशी संपर्क साधला.
आणि तिच्या थोरल्या बहिणीशी असलेले नाते सार्वजनिक करण्याची धमकी दिली. तिला प्रत्यक्ष भेटण्यासाठी व वासनापूर्तीसाठी मुलींची माहिती देण्यास सांगितले. याप्रकरणी सध्या तपास सुरू आहे.
दरम्यान, मुलींशी मैत्री करून व लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणे व त्याचे व्हिडीओ इतरांना पाठवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकणी कुडचडे पोलिसांनी २२ मार्च रोजी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती.