दाबोळी विमानतळावरील टर्मिनल-२ मधील स्टोअर रूमला आग

वेळीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
24 mins ago
दाबोळी विमानतळावरील टर्मिनल-२ मधील स्टोअर रूमला आग

दाबोळी : गोव्यातील (Goa)  दाबोळी विमानतळावरील (Dabolim Airport)  टर्मिनल-२ मधील स्टोअर रूमला (Store room) अचानक आग लागल्याची घटना घडली. आग वेळीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला. आग विझवण्यासाठी   टर्मिनल-२ चा काही भाग काही मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आला.

या स्टोअर रूममध्ये विद्युत साहित्य व विविध उपकरणे साठवून ठेवलेली होती.  त्याचे आगीत नुकसान झाले. आग (Fire) लागल्याचे दिसताच उपलब्ध ‘फायर एक्स्टिंग्विशर’च्या सहाय्याने काही वेळातच आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, आग विझवण्याच्या कामादरम्यान टर्मिनल-२चा काही भाग काही मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून; पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा