युवकांच्या कौशल्य विकासासाठी सात सामंजस्य करार

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
51 mins ago
युवकांच्या कौशल्य विकासासाठी सात सामंजस्य करार

पणजी : युवकांच्या कौशल्य विकास (Skill Development)  कार्यक्रमांना बळकटी देणे, व्यावसायिक शिक्षणाला (Education)  प्रोत्साहन देणे तसेच सरकारी खाती (Government Department), शैक्षणिक संस्था (Educational institute) व उद्योग भागीदारांमधील सहकार्य वाढवण्यासाठी राज्य सरकारने नुकतेच सात सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री (Chief Minister)  डॉ प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच अन्य पाच खात्यांतर्फे हे करार करण्यात आले आहेत.

राज्यातील १० सरकारी आणि ३ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) “द बर्ड्स अँड द बीज टॉक” जीवन कौशल्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कौशल्य विकास खाते, प्लॅन इंटरनॅशनल (इंडिया चॅप्टर) आणि वर्शिप डिझाइन यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्री कौशल्य पाठ योजनेअंतर्गत मशरूम लागवडीमध्ये अल्प-मुदतीचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यासाठी खात्याने वाना श्रब्स प्रा. लि. सोबत करार केला आहे. या उपक्रमांतर्गत ऑयस्टर मशरूम लागवडीमध्ये वैज्ञानिक आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यामुळे सहभागींना स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करता येतील. तसेच शाश्वत व पर्यावरणपूरक कृषी पद्धतींना प्रोत्साहन मिळेल. शिक्षण खात्यासोबतच्या करारामुळे इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयटीआयला 'ओपन डे' भेट सुलभ होईल. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण होईल.

दुहेरी प्रमाणपत्र 

उच्च शिक्षण संचालनालयासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे मुख्यमंत्री कौशल्य पाठ योजनेअंतर्गत दुहेरी प्रमाणपत्र कार्यक्रम शक्य होणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासोबतच कौशल्य-आधारित प्रशिक्षण देखील घेता येणार आहे.


 



हेही वाचा