सुदिन मुख्यमंत्री होण्यासाठी मगोला २१ आमदारांची गरज !

दीपक ढवळीकर : २०२७ मध्ये भाजपसोबत युती कायम राहणार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th April, 11:37 pm
सुदिन मुख्यमंत्री होण्यासाठी मगोला २१ आमदारांची गरज !

फोंडा : जनतेने मगो पक्षाला २१ आमदार निवडून दिल्यास सुदिन ढवळीकर निश्चित मुख्यमंत्री बनू शकतात. पण, २०२७ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा भाजप-मगोची युती टिकणार असल्याची माहिती मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दिली आहे.
फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणूक न्यायालयाच्या आदेशानंतर रद्द झाली त्यासंबधी प्रतीक्रिया व्यक्त करताना दीपक ढवळीकर यांनी मगो पक्षाने यापूर्वी भाऊसाहेब बांदोडकर व शशिकला काकोडकर यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगले काम केले आहे. भविष्यात जर लोकांना सुदिन ढवळीकर यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा असेल तर मगो पक्षाचे २१ आमदार निवडून येणे गरजेचे आहे.
पोटनिवडणूकीत भाजप-मगो युतीचा उमेदवार रितेश नाईक यांचा विजय निश्चित झाला होता. पण न्यायालयच्या आदेशामुळे पोटनिवडणूक रद्द झाली. प्रचारावेळी सरकारने जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहे. २०२७ सालीची विधानसभा निवडणुकीपर्यंत मतदारसंघाला विना आमदार सरकारला विकासकामे करावी लागणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.

हेही वाचा