स्व. रवी नाईक सारखी मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली का वाहिली नाही? : उत्पल

उच्च न्यायालयाच्या नव्हे निवडणूक आयोगाच्या निर्णायाने धक्का

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
09th April, 12:36 pm
स्व. रवी नाईक सारखी मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली का वाहिली नाही? : उत्पल

पणजी : रवी नाईक (Ravi Naik)  यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे पुत्र रितेश नाईक यांना भाजपने (BJP) फोंडा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली.मग अशीच श्रद्धांजली स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांना  का वाहिली नाही? असा प्रश्न उत्पल पर्रीकर यांनी केला. उच्च न्यायालयाच्या (High Court) निवाड्यापेक्षा फोंडा पोटनिवडणुकीची (Ponda by-election)  तारीख उशीरा जाहीर करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय धक्का देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. 

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आणि सामाज‌िक कार्यकर्ते उत्पल पर्रीकर यांनी पणजीत  पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पणजी महापालिका निवडणुकीत मतदान गोपनीयतेचा भंग झाला. त्यामुळे महापालिका निवडणुकीला जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे. फोंडा पोटनिवडणुकीप्रमाणे पणजी महापालिका निवडणूक रद्द करण्याचा निवाडा येणार, अशी मला खात्री आहे. 

महापाल‌िका निवडणुकीत प्रभाग फेररचना प्रक्रिया नगरपालिका प्रशासन संचालनालयाने केली. प्रभाग फेररचना राज्य निवडणूक आयोगाने करायला हवी होती. तसेच मतदान यंत्रा ऐवजी मतपत्र‌िकेचा वापर मतदानासाठी का केला? याच्या पूर्वी महापालिका निवडणुकीत मतदान यंत्राचा वापर केला आहे.

मत्रपत्रिकेमुळे गोपनीयतेचा भंग होण्यास वाव मिळाला. हे मुद्दे याचिकेत आहेत. आता नगरपालिका निवडणूक होणार आहे. निवडणूक होणार असलेल्या नगरपालिका प्रभागांची फेररचना व्यवस्थित व्हावी आणि निवडणूक योग्य प्रकारे व्हावी हा हेतू ही याचिका दाखल करण्यामागे आहे. फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्याने फोंडा मतदारसंघ आता पुढील निवडणुकीपर्यंत आमदाराशिवाय राहणार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा