शिरगाव जत्रोत्सव: स्टॉल्सच्या परवानगीसाठी जिल्हा प्रशासनाची कडक नियमावली जाहीर

केली आठ सदस्यीय विशेष समितीची नियुक्ती; मुख्य रस्ते मोकळे ठेवण्याचे आदेश.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
59 mins ago
शिरगाव जत्रोत्सव: स्टॉल्सच्या परवानगीसाठी जिल्हा प्रशासनाची कडक नियमावली जाहीर

पणजी :  शिरगाव येथील श्री देवी लईराईचा जत्रोत्सव यंदा २१ एप्रिल २०२६ रोजी साजरा होत आहे. या उत्सवाचे महत्त्व आणि तिथे होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता, उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने कडक पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी जत्रोत्सवादरम्यान झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेतून धडा घेत, यंदा प्रशासनाने चोख गर्दी व्यवस्थापन आणि स्टॉल्सच्या नियोजनासाठी डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय विशेष समितीची नियुक्ती केली आहे. उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (DDMA) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परब यांनी या संदर्भात अधिकृत आदेश जारी केले आहेत.


Goa Stampede: Chief Minister Orders Probe After 6 Dead, Assures Help To  Victims


शिरगावची जत्रा ही केवळ गोव्यातच नव्हे, तर शेजारील राज्यांतील हजारो धोंड आणि भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या उच्च गर्दीच्या धार्मिक सोहळ्यात भाविकांची सुरक्षा धोक्यात येऊ नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेही विशेष दखल घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि त्यानंतर नियुक्त केलेल्या तथ्य शोध समितीच्या (Fact-Finding Committee) शिफारशींच्या आधारे यंदाच्या जत्रेसाठी विशेष 'इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅन' तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करणे सर्व संबंधित विभाग आणि भागधारकांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे.


Several dead and injured in stampede at Goa Lairai Devi temple


प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, जत्रेच्या मुख्य परिसरात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी विक्रेते आणि स्टॉल्सवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. रस्त्याच्या मुख्य वहिवाटीच्या ठिकाणी किंवा अरुंद गल्ल्यांमध्ये कोणतेही स्टॉल्स लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. 'बॉटलनेक' म्हणजेच गर्दीची कोंडी टाळण्यासाठी मुख्य रस्ते पूर्णपणे मोकळे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय पंचायतीला कोणत्याही विक्रेत्याला ना-हरकत दाखला (NOC) देता येणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे.


70,000 people, an electric shock': What led to deadly stampede at Goa  temple?| India News


जत्रेतील स्टॉल्सची संख्या निश्चित करण्यासाठी आणि त्यांच्या मांडणीला (लेआउट) तांत्रिक मंजुरी देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद डिचोलीचे उपजिल्हाधिकारी भूषवणार आहेत. या समितीत डिचोलीचे उपअधीक्षक, अग्निशमन दलाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वीज विभागाचे कार्यकारी अभियंता, देवी लईराई संस्थानचे प्रतिनिधी, शिरगाव पंचायतीचे सचिव आणि डिचोलीचे मामलेदार यांचा समावेश आहे. ही समिती जत्रेच्या ठिकाणच्या जागेची पाहणी करून १० एप्रिल २०२६ पर्यंत आपला सविस्तर अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करणार आहे.


North Goa Administration Steps Up Safety Measures for Shri Devi Lairai Jatra  2026 in Shirgao – 28 February 2026 | O Heraldo


या समितीवर स्टॉल्सच्या मांडणीसह तिथे होणारी विजेची व्यवस्था, अग्निशमन सुरक्षा आणि अनधिकृत अतिक्रमणे हटवण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते रुंद ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बाहेर पडण्याचे मार्ग (Exit Routes) सुलभ ठेवणे, याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जत्रोत्सवाचा आनंद सुरक्षित वातावरणात घेता यावा, यासाठी प्रशासन आणि देवस्थान समिती आता युद्धपातळीवर कामाला लागली आहे.

हेही वाचा