मेरशी येथील महामार्गावर कार उलटून अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली दुर्घटना; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
मेरशी येथील महामार्गावर कार उलटून अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

पणजी: गोव्यातील मेरशी येथील महामार्गावर गुरुवारी सकाळी एका कारला अपघात झाला. भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गावरच उलटली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारमधील कोणाही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. 

प्राप्त माहितीनुसार, ही कार महामार्गावरून जात असताना अचानक चालकाचा ताबा सुटला आणि वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. कार पूर्णपणे पलटी झाली होती. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अपघातातून बचावलेले प्रवासी सुखरूप असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करण्यासाठी तातडीने हालचाली केल्या आणि क्रेनच्या साहाय्याने कार हटवून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

महामार्गावरील वाढते अपघात ही चिंतेची बाब बनली असून, चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे आणि वळणांवर सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. विशेषतः हायवेवर गाडी चालवताना एका क्षणाचे दुर्लक्षही जीवावर बेतू शकते, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.

हेही वाचा