
पणजी : म्हापसा बाजारात (Mapusa Market) अज्ञात चोरांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत सहा दुकाने (Five Shops) फोडून रोख रक्कम लंपास केली. अज्ञात चोरट्यांनी दुकाने फोडून आत प्रवेश केला आणि काउंटरमध्ये ठेवलेली रोख रक्कम लंपास करून पसार झाले.
स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. सकाळी दुकाने उघडण्यासाठी आलेल्या मालकांना चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी (Goa Police0 घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या (CCTV Footage) आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे बाजारातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.