सणांना रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी

विविध सण, उत्सवांसाठी मिळाली सूट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
02nd April, 10:36 pm
सणांना रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी

पणजी : गोव्यात २०२६ या वर्षात विविध सण आणि उत्सवांच्या निमित्ताने रात्री १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) किंवा सार्वजनिक ध्वनीप्रणाली वापरण्यास राज्य सरकारने अधिकृत परवानगी दिली आहे. यासंदर्भातील विशेष अधिसूचना गृह खात्याकडून जारी करण्यात आली असून, विशिष्ट दिवसांसाठी ध्वनी प्रदूषणाच्या नियमांतून दोन तासांची शिथिलता देण्यात आली आहे.

ध्वनिक्षेपकासाठी सवलत असलेले दिवस (२०२६)

तारीख सण / उत्सव
४ एप्रिलइस्टर इव्ह
५ एप्रिलइस्टर डे
१५ सप्टेंबरगणेश चतुर्थी (दुसरा दिवस - विसर्जन)
१८ सप्टेंबरगणेश चतुर्थी (पाचवा दिवस - विसर्जन)
२४ सप्टेंबरअनंत चतुर्दशी
२० ऑक्टोबरनवरात्री (शेवटचा दिवस)
७ नोव्हेंबरदिवाळी रात्र
२४ व २५ डिसेंबरख्रिसमस इव्ह व ख्रिसमस
२६ ते ३१ डिसेंबरनवीन वर्षाचा कालावधी (New Year's Eve)

या अधिसूचनेनुसार, सवलत दिलेल्या दिवशी ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा स्थानिक प्राधिकरणाकडे रीतसर अर्ज करणे आवश्यक आहे. प्रत्येक अर्जाचा स्वतंत्र विचार करूनच प्रशासनाकडून ही परवानगी दिली जाणार आहे. तसेच, परवानगी मिळाल्यानंतरही 'ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २०००' मधील तरतुदींचे पालन करणे सर्व आयोजकांना बंधनकारक राहील.

उत्सवाच्या काळात आवाजाच्या पातळीवर (Noise Level) नियंत्रण ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रात्री १२ वाजेची मुदत संपल्यानंतर किंवा विहित मर्यादेपेक्षा जास्त आवाज आढळल्यास संबंधित प्राधिकरणाकडून त्वरित कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

#GoaGovernment #LoudspeakerPermission #GoaFestivals2026 #NoisePollutionRules #EasterGoa #GaneshUtsav #ChristmasGoa #NewYearGoa