अभीर हेदे माहिती संचालक : दीपक बांदेकर समाज कल्याण संचालकपदी

अभीर हेदे
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा नागरी सेवेच्या १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त खाण संचालक अभीर हेदे यांची माहिती व प्रसिद्धी खात्याच्या संचालकपदी बदली झाली असून माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांची समाजकल्याण खात्याच्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश कार्मिक खात्याचे अवर सचिव रघुराज फळदेसाई यांनी जारी केला आहे.
या आदेशानुसार, अभीर हेदे आता माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक बनले असून दीपक बांदेकर समाजकल्याण खात्याचे संचालक बनले आहेत. अरविंद बुगडे यांची लोकायुक्ताच्या सचिवपदी, मॅन्युएल बॅरेटो यांची मडगाव रवींद्र भवनच्या सदस्य सचिवपदी, अजित पंचवाडकर यांची अपारंपरिक ऊर्जा खात्याच्या संचालकपदी, गौरीश शंखवाळकर यांची गोवा ऊर्जा विकास संस्थाचे (गेडा) संचालकपदी, विशांत नाईक गावणेकर यांची अतिरिक्त खाण संचालकपदी बदली झाली आहे. सोहन उसकयकर यांची अतिरिक्त अबकारी आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे गोवा औद्योगिक विकास महामंडळ (आयडीसी) सरव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. गौरेश पिळगावकर यांची राज्य कर अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे गोवा हस्तकला ग्रामीण व लघु उद्योग विकास महामंडळ (जीएचआरएसएसआयडीसी) व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त ताबा सोपवण्यात आला आहे. दर्शनी देसाई यांची मानसोपचार संस्थेचे (आयपीएचबी) संचालक (प्रशासन)पदी बदली झाली आहे. जुवाव फर्नांडिस यांची दक्षिण गोवाच्या अतिरिक्त पंचायत संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कुशावती जिल्ह्याचे अतिरिक्त पंचायत संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फियोना कार्दोझ यांची अतिरिक्त पंचायत संचालक (I)पदी, तर दीपक देसाई यांची नागरी उड्डाण संचालकपदी बदली करण्यात आली आहे.